प्रतिबिंब by अभिषेक दळवी (tharntype novel english .TXT) 📖
- Author: अभिषेक दळवी
Book online «प्रतिबिंब by अभिषेक दळवी (tharntype novel english .TXT) 📖». Author अभिषेक दळवी
आज किती तरी वर्षानी निवांत वेळ मिळाला होता सगळ्या व्यापातून
" बर झालं बाई तुमचा पाय मूरगळल तो त्या निमित्ताने जरा आराम तरी भेटेल नाहीतर इतक्या वर्षात आपल्या दोघांना एकांतात कुठे जाता तरी आल होत का ? " हे आमच्या सौभाग्यवतींचे उद्गार .पाय मुरुगळण फक्त निमित्त होत तिची फार वर्षापासूनची ईश्चा होती इतर स्त्रियांसारखी नवऱ्याने आपल्याला वेळ द्यावा आठवड्यातून एकदा सिनेमाला न्याव , एकत्र पिकनिकला जाव पण माझ्या कामामुळे कधी दिल्ली तर कधी कोलकाता जिथे माझी गरज पडेल तिथे मी हजर असायचो त्यामुळे तिला वेळ फार कमीच देऊ शकलो पण तिने कधी तक्रार केली नाही .संसाराचा सगळा गाडा तिने उत्तम सांभाळला तस आमच एकत्र कुटुंब त्यामुळे तिला कधीच एकटेपणाची जाणीव झाली नाही . मी मनात आणलं असत तर मी ही सामान्य आयुष्य जगू शकलो असतो पण मला तशी जगायची अजिबात हौस नव्हती . प्रत्येक क्षणी काहीतरी नाविन्यपूर्ण करण , गूढ उकलण्याचा प्रयत्न , काही तरी रहस्यमय गोष्टी शोधून काढण मग दिवसभर त्याचाच विचार आणि शेवटी ते गूढ उकलल्याच समाधान हा माझा स्वभाव यातूनच मी माझा व्यवसाय निवडला .
आयुष्यात कशाची कमी नव्हती हातात बी .ए .ची डिग्री होती वडिलांची पाच दुकानं त्यामुळे घरात चांगला पैसा खेळत होता .मी कॉलेजला असतानाच ठरवल प्राइवेट डिटेक्टिव बनायचं . घरात जेव्हा हे सांगितल तेव्हा सगळ्यांच्या चेहऱ्यावर प्रश्नचिन्ह होत त्या वेळी भारतात डिटेक्टिव हा प्रकार जास्त प्रसिध्द नव्हता मी सगळ्यांना समजावलं पण बाबा तयार होत नव्हते त्यांची ईश्चा होती आम्ही तिन्ही भावांनी त्यांची दुकानं सांभाळावी धंदा वाढवावा . माझे भाऊ त्यांच्या ईश्चे नुसार वागत होते पण मी त्यांच्या सारखा नव्हतो . मला काहीतरी वेगळ करायच होत पण बाबा शेवटपर्यंत तयार होईनात .शेवटी आईने समजावलं तेव्हा फार विचार करून त्यांनी मला स्वतःला सिद्ध करण्याची संधी दिली त्यात अट अशी होती सहा महिन्यांच्या आत मी एक केस यशस्वीपणे पार पाडायची आणि ते जर जमल नाही तर बाकीच्या दोन भावंाबरोबर धंदा सांभाळायचा .माझ्या हातात फक्त सहा महीने होते मी सगळीकडून प्रयत्न सुरू केले .प्रदीपने त्याच्या सगळ्या ओळखी पणाला लावल्या . अर्थात त्याच्या संपर्कात आल्यावरच मी डिटेक्टिव बनायच ठरवल होतं त्यानेच मला या क्षेत्राची ओळख करून दिली .आमची कॉलेजच्या पहिल्या वर्षापासूनची मैत्री त्याची या क्षेत्रात व्यवसाय करायची ईश्चा होती पण म्हणावं तेवढ धाडस त्याच्यात नव्हतं वडील दोन वर्षापूर्वी वारले घरची परिस्थिती गरीबीची ह्याच्या वरच त्याच्या आईच आणि बहिणीच आयुष्य अवलंबून होत त्यामुळे आपण यशस्वी होऊ की नाही नाहीतर घर कस चालेल ही धाकधुक त्याच्या मनात होती . मीच त्याची समजूत काढून त्याला तयार केलं त्यामुळे एका अर्थाने त्याची जवाबदारीही माझ्यावरच आली होती जे काही करायच होत ते या सहा महिन्यातच करायच होत त्याचे वडील पोलीसात होते त्यामुळे त्याच्या तिथे चांगल्या ओळखी होत्या त्या सगळ्या त्याने पणाला लावल्या आणि पहिली केस आम्हाला मिळाली .
आयुष्यात काही गोष्टी अशा घडतात की वाटत त्या नियतीने आधीच लिहून ठेवल्या असाव्यात प्रत्येक घटनेसाठी एका ठराविक व्यक्तीची नेमणूक केली असावी तशीच कदाचित इथे माझी नेमणूक केली होती .मला या केसची गरज होती आणि या केसला माझी कारण मी नसतो तर ह्या केसचा गुंता कधी सुटलाच नसता हे मी ठामपणे सांगू शकतो .
इन्स्पेक्टर जाधव त्यांच्यामुळे ही केस आम्हाला मिळाली प्रदीपचे वडील त्यांच्याच हाताखाली काम करत होते त्यांना प्रदीपबद्दल सहानुभूति होती . आम्हाला एक संधी मिळावी अशी त्यांचीही ईश्चा होती .ही केस होती नाशिकचे उद्योगपती रतन पटवर्धन यांची ते बेपत्ता झाले होते .उद्योग जगतातील एक सुप्रसिद्ध व्यक्ति अशा रितीने बेपत्ता झाली होती पोलीसही त्यांचा अजून तपास लावू शकले नव्हते त्यामुळे खळबळ माजली होती .पोलीसांवरचा दबाव वाढत चालला होता याचा तपास इन्स्पेक्टर मानके करत होते त्यांच्या हाताखाली सबइन्स्पेक्टर विजय होते इन्स्पेक्टर मानके आणि इन्स्पेक्टर जाधवांची फार जुनी ओळख होती या केस मधे आमची काही मदत होईल म्हणून आमच नाव त्यांनी मानकेंना सुचवलं तेही लगेच तयार झाले .नाशिकला निघण्याची तयारी झाली .आम्ही स्टेशनवर गाडीची वाट पाहत उभे होतो . प्रदीपच्या चेहऱ्यावरून त्याच्या मनाची घालमेल दिसून येत होती जर सहा महिन्यांच्या आत कोणती केस सोडवली नाही तर मला माझा हा हट्ट सोडावा लागणार होता या नंतर आपल काय होईल ही चिंता त्याला सतावत होती त्याला समजावण्याचा प्रयत्न मी करत होतो पण माझ्या मनावरही ताण होताच . रात्री आम्ही नाशिकला पोचलो विजय आम्हाला स्टेशनवर घ्यायला आला तो आमच्यापेक्षा चार पाच वर्षानी मोठा असावा . रात्रीचा मुक्काम जवळच्याच एका लॉजवर केला सकाळी तिथेच काहीतरी खाऊन पिऊन विजयला भेटलो तो आम्हाला घेऊन इन्स्पेक्टर मानकेंकडे गेला त्यांना इन्स्पेक्टर जाधवांनी आमच्याबद्दल पूर्ण कल्पना दिली होती त्यांच्याकडून केसची जुजबी माहिती आम्हाला मिळाली .आज सहा ऑगस्ट होती रतन पटवर्धन वीस जुलैला बेपत्ता झाले अजून काही धागे दोरे सापडत नव्हते त्यात दिवसेंदिवस गुंता वाढत होता . वरिष्ठांकडून दबाव वाढत चालला होता . मानके साहेबांनी आम्ही लॉजवर न राहता रतन साहेबांच्या घरात राहण्याचा आम्हाला सल्ला दिला .मानके साहेबांच्या एकंदरीत वागणूकीवरून त्यांचा हेतु माझ्या लक्षात होता त्यांची ईश्चा होती आम्ही घरात जाऊन तपास करावा तेव्हाच आम्हाला ही गोष्ट कळली ही बेपत्ता होण्याची केस होती त्यात पोलिसांचा संशय रतन साहेबांचा चुलतभाऊ अमित आणि सावत्रभाऊ विक्रम याच्यावर होता . रतन साहेब आणि या दोघांत प्रॉपर्टीवरून वाद होते . संशयाची पाळमूळ बाहेर असताना घरात जाऊन तपास करण्याची गरज मानके साहेबांना का वाटावी हे कळत नव्हतं त्यांच्या म्हणण्याप्रमाणे आम्ही संध्याकाळी रतनसाहेबांच्या बंगल्यावर पोचलो त्यांचे शहरातही बंगले होते हा त्यांचा पूर्वापार चालत आलेला बंगला त्यांचा मुक्काम बहुधा इथेच असायचा . चांगलाच एक दीड एकर परिसरात पसरला होता .बांधकाम जुन्या पद्धतीच होतं बाजूला दूरवर बाग पसरली होती, आत आलो मोठाच्या मोठा दिवाणखाना, समोर रुंद जिना वरच्या मजल्यावर जात होता ,भिंतीवर पूर्वजांची मोठमोठी तैलचित्र दिसत होती,जमिनीवर उंची गालिचे पसरले होते .आम्हाला पाहून एक सडपातळ बंाध्यची , केसांची वेणि बांधलेली एक स्त्री आमच्याकडे धावत आली ती मोलकरीन असावी . मानके साहेबांशी काही तरी बोलून जिना चढून वर गेली .आम्ही सोफ्यावर बसून वाट पाहू लागलो काही वेळाने एक भरीव बंाध्यची , गोरीपान ,भरजरी साडी नेसलेली ,कोपरापर्यंत नक्षीदार ब्लाउज ,कपाळावर मोठी टिकली , अंगभर दागिन्यांनी नटलेली एक स्त्री जिने उतरून येऊ लागली ह्या मिसेस पटवर्धन मानके साहेब बोलले .प्रदीपच्या लक्षात आल की माहीत नाही पण माझ्या डोक्यात विचारांची चक्र फिरू लागली .मी रतन साहेबांची माहिती घेतली होती त्या नुसार ते वयस्कर होते चाळिशीच्या आसपास असावे आणि त्यांच्या पत्नी वयाने तरुण त्यात अतिसुंदर अशा स्त्रीने आपल्यापेक्षा वयाने इतक्या मोठ्या असलेल्या माणसांशी लग्न का करावं केवळ पैसा बघून जर ही स्त्री पैशांच्या लालसेपोटी लग्न करू शकते तर त्यांच्या जीवाच काही बर वाईट का नाही करू शकत माझ्या मनात शंका उमटुन गेली .आम्ही घरात राहून तपास करावा हे मानके साहेबांना वाटत होत त्याच कारण मला आता कळत होतं माझ्या मनात जी शंका होती तीच त्यांना आली असावी .मिसेस पटवर्धन आमच्या समोर येऊन बसल्या .आमच लक्ष वर गेल वरून एक वीस बावीस वर्षाची काहीशी ठेंगणी पण सुडौल बंाध्याची तरूणी येताना दिसली . मानके साहेब म्हणाले होते इथे मिसेस पटवर्धनांसोबत रतन साहेबांची आतेबहीण सुनीता राहत होती ही तीच असावी . चेहऱ्यावर घमेँड झळकत होती ती मिसेस पटवर्धनांच्या बाजूच्या कोचवर येऊन बसली तिने मानके साहेबांना तपास कुठपर्यंत आलाय त्यांनी जितका तपास लागला होता त्या बद्दल सांगितल .
" आज इतके दिवस झालेत तरी तुमच्या तपासात काहीच प्रगती दिसत नाही " मिसेस पटवर्धनांनी विचारल .
" आम्ही आमच्या परीने पूर्ण प्रयत्न करतोय काही दिवसातच पटवर्धन साहेब सापडतील " मानके साहेब बोलले .
" अजून किती दिवस कुठे असतील कसे असतील त्यांच काही बर वाईट . . ." म्हणत मिसेस पटवर्धन आसव गाळू लागल्या त्या सरशी बाजूच्या कोचावर बसलेली सुनीता त्यांच्या बाजूला येऊन बसली त्यांना धीर देऊ लागली .थोडा वेळ मला मनातून चरकल्यासारख झालं उगाच यांच्यावर संशय घेतला अस वाटू लागलं काही क्षणांणी त्या शांत झाल्या .
" हे पाहा तुम्ही धीर सोडू नका आमचे प्रयत्न चालू आहेत हे प्रदीप आणि अनिल प्राइवेट डिटेक्टिव आहेत हे ही आमच्या सोबत या केसमधे काम करतायेत " त्यांनी आमची ओळख करून दिली .
" तर हे आहेत ते " सुनीता पुटपुटली .
" म्हणजे ह्यांच्या बद्दल तुम्हाला माहितीये " मानके साहेबांनी विचारल
" नाही . . . .म्हणजे मी सहजच बोलले " ती बाजू सावरत म्हणाली.
जी शंका त्यांना आली तीच मलाही आली हिला कोण डिटेक्टिव येणार आहेत ते कस माहीत ?
" तर मी अस विचारायला आलो होतो की तपास पूर्ण होईस्तोवर हे या बंगल्यात राहू शकतात का ?? "
" इथे कस शक्य आहे . . . . . ." सुनीता नकार देऊ लागली पण मिसेस पटवर्धनांनी तिच्याकडे एकवार पहिल आणि नजरेने शांत राहायची खूण केली माझ्या नजरेतून ते सुटल नाही .
" या केस संदर्भात तुम्हाला हवी ती मदत करण्याची आमची तयारी आहे " मिसेस पटवर्धननी आश्वासन दिल .
आम्ही त्यांचा निरोप घेऊन तिथून निघालो मानके साहेब पुढे निघून गेले .आठ वाजत आले होते थंडीचे दिवस होते वातावरणात बर्यापैकी गारठा जाणवत होता . विजय ,मी आणि प्रदीप तिघे येताना एका चहाच्या टपरीवर थांबलो .
" ह्या केस बद्दल तूझ काय मत आहे " प्रदीपने चहा घेत विजयला विचारल .
" मला आधीपासून ही केस तशी सरळच वाटतेय भावांभावात प्रॉपर्टीवरून वाद मग भांडण नंतर धमक्या आणि शेवटी बदला घेण्यासाठी हे सर्व केल असावं " तो चहाचा घोट घेत म्हणाला .
" रतन साहेबांबद्दल काय मत आहे तूझ फक्त अपहरण की अजून काही " मी विचारलं .
" फक्त अपहरण करून करणार काय जर एखाद्या टोळीच हे काम असत तर आता पर्यंत खंडणीसाठी फोन आले असते पण तस काहीच झाल नाही " तो म्हणाला
" मग "
" त्यांच्या एखाद्या शत्रूच हे काम असाव त्यांचे बिजनेसमधे तस कोणाशी शत्रुत्व नव्हत आणि अगदी जीवावर बेतेल असा कोणीच शत्रु नव्हता पण मी ज्या दोन भावांबद्दल बोलतोय त्यांच्यावरच आमचा संशय आहे "
" मिसेस पटवर्धनांवर तुम्हाला संशय नाही येत ?? " माझ बोलण ऐकून विजय थोडा हसला .
" पटवर्धन साहेब आणि मिसेस पटवर्धनांच्या वयातल्या फरकावरून तू बोलतोयस ना मानके साहेबांनी सुद्धा हीच शंका काढली होती पण मला नाही वाटत त्यांच्यावर संशय घ्यावा " हातातला चहाचा संपलेला ग्लास खाली ठेवत म्हणाला .
" जरा अवघडच वाटतय सगळ " प्रदीप म्हणाला .
" हम्म आणि वरूनही दबाव वाढत चाललाय म्हणून तुमच्याबद्दल जेव्हा त्यांना कळल तेव्हा ते लगेच तयार झाले . . . .बघा तुम्हाला जमतय का " एवढ बोलून विजय बाईकवरून निघून गेला .
आम्हीही थोड्या वेळाने निघालो उद्या सकाळी पटवर्धन साहेबांच्या बंगल्यावर सामान हलवायच होत तिथे राहायची परवानगी भेटली होती .लॉजवर येई पर्यंत जरा उशीरच झाला प्रदीप पडल्या पडल्या झोपला पण मला काही इतक्या लवकर झोप लागणार नव्हती . माझ्या डोक्यात विचार घोळत होते . मला सारखा त्या मिसेस पटवर्धनांवरतीच संशय येत होता मघाशी मला त्यांचे अश्रू पाहून थोड वाईट वाटलं होत पण आता त्यांच ते रडणं ही खोट वाटत होतं उद्या बंगल्यावर जायच्या आधी मानके साहेबांना भेटायच ठरवलं .
इथे येऊन अर्धा तास झाला होता मानके साहेब अजून आले नव्हते . सकाळी जरा लवकरच जाग आली प्रदीप अजून झोपेतच होता तो लवकर उठणार नाही याची मला कल्पना होती . मी तयारी करून पोलीस स्टेशनला आलो पण अजून मानके साहेबांचा पत्ता नव्हता मी खुर्चीवरून उठणार तितक्यात माझ्या खांद्यावर थाप पडली मागे मानके साहेब उभे होते ते समोर खुर्चीवर येऊन बसले .
" आज सकाळीच सकाळी कस येणं केलत " त्यांनी विचारलं .
"थोडं बोलायचं होत "
" काही घेणार ?? "
" नाही नको "
" काय बोलायच होत ?? "
" ही केस बेपत्ता होण्याची आहे आणि तुम्ही आमची राहण्याची व्यवस्था बंगल्यावर करताय या दोघांत काही संबध . . . . . . . "
" याच प्रश्नाची कधीपासून प्रतीक्षा होती "
" म्हणजे ? "
" ही केस दिसते तितकी सोपी नाही फार गुंतागुंतीची आहे "
" कळल नाही "
" ही केस वर वर जरी बेपत्ता होण्याची किंवा अपहरणाची वाटत असली तरी तस नाहीये नाहीतर आम्हाला हा गुंता सोडवण सहज शक्य होत त्या साठी तुम्हाला बोलावायची काय गरज होती "
" मग अडचण काय आहे "
" अडचण ही आहे मला अस कळलय की रतन पटवर्धननी आपल्या बेपत्ता होण्याच्या दोन दिवस आधी त्यांच्या वकिलांशी म्रुत्यूपत्र बनविण्यासंबंधी बोलणी केली होती आता हा प्रश्न उपस्थित होतो त्यांना अस करायची गरज का वाटली असावी त्यांच वय जास्त नव्हत किंवा त्यांना कोणता आजार नव्हता याचा अर्थ कळतो त्यांना कोणापासून तरी धोका होता आणि ही गोष्ट त्यांना माहिती होती
" तुमचा कोणावर संशय आहे ?? "
" विक्रम "
" तो रतन साहेबांचा भाऊ "
" हो भाऊ पण सावत्र . . . . . . ."
" सावत्र "
" हो पटवर्धन साहेबांना दोन भाऊ आहेत अमित आणि विक्रम हा विक्रम त्यांचा सावत्र भाऊ असल्याने लहानपणापासुनच त्याच्या मनात पटवर्धन साहेबांबद्दल द्वेष होता त्यात ह्याला प्रॉपर्टीमधे हिस्सा दिला नव्हता तो राग याच्या मनात असणारच "
" काय करतो काय हा "
" दारूच्या भट्टया ,जुगाराचे अड्डे आहेत याचे "
" तुम्ही चौकशी केली त्याची ?? "
" नाही ज्या दिवशी पटवर्धनबेपत्ता झाले तेव्हा पासून हा गायब आहे "
" म्हणजे हे सर्व काम ह्याचच आहे हाच गुन्हेगार आहे " " याचा जर काही हात असता तर केसमधला गुंता इतका वाढलाच नसता प्लँन करून पटवर्धन साहेबांच अपहरण करण किंवा त्यांचा खून करून प्रेताची विल्हेवाट लावण्या इतपत डोक नाही आहे याच्या कडे मी म्हणालो
Comments (0)