प्रतिबिंब by अभिषेक दळवी (tharntype novel english .TXT) 📖
- Author: अभिषेक दळवी
Book online «प्रतिबिंब by अभिषेक दळवी (tharntype novel english .TXT) 📖». Author अभिषेक दळवी
प्रतापराव सगळ ऐकून घेत राहिले त्यांना तिथे थांबण आता अशक्य झाल होतं .त्यांच्या डोळ्यात सलनारी ती व्यक्ति म्हणजे सदाशिवरावच होते . चहापानाचा कार्यक्रम आटोपल्यावर ते तडक उठून निघाले .
गाडी वाड्यासमोर येऊन थांबली ते तावातावातच भल्या मोठ्या दरवाजातून आत आले . हातातली काठी एका नोकराकडे भिरकावली आणि सरळ ओसरीवर येऊन झोपाळ्यावर जाऊन बसले त्यांच्या झोके घेण्याने झोपाळा कर्रकर्र आवाज करत झोपाळा मागे पुढे झूलू लागला .बाजूला दत्तू येऊन उभा राहिला समोर जुन्यापध्दतीच्या लाकडी सोफ्यावर एक ऐंशी पार केलेली व्रूद्ध स्त्री बसली होती .कपाळापासून पायाच्या घोटीपर्यंत लपेटलेली लाल साडी केवळ चेहरा आणि हाता पायाचे पंजे सोडले तर बाकीचं सर्व शरीर साडीत लपेटलेलं होतं ती स्त्री म्हणजे आत्याबाई . एक नोकर पाण्याचा ग्लास घेऊन त्यांच्या झोपाळ्यासमोर येऊन उभा राहिला त्यांनी हाताने तो ग्लास उडवून लावला ग्लास कणकण वाजत बाजूला जाऊन पडला . झोपाळ्या खाली पाण्याची चैन झाली .काही तरी बिनसलय हे आत्याबाईंनी ओळखल त्यांनी नजरेनेच नोकराला जायची खूण केली तसा तो निमुटपणे तिथून निघून गेला .
" दत्तू तूझ्या मालकाच लक्ष थाऱ्यावर नाहीये काय झालया ?? " आत्याबाईंनी अाप्पासाहेबांकडे पाहत दत्तूला विचारल .
" आव आत्याबाई काय न्हाई झाल ते इचारा . . . .मालकांनी आजवर इथं राज केल पन आजकाल लुंगीसुंगीपन डोक वर काढाया लागल्याती "
" दत्तू कोणाच बर सांगतुयास "
" आव तो सदाशीव काय तो रूबाब बायंाच्या अंगावर ते दागदागिने अब . .ब .ब काय ती घमेंड . .मालकांस्नी फगस्त बोलवायच म्हणून बोलावलं व्हतं वाटलं " दत्तू अगदी तिखट मीठ लावून सांगत होता .
" त्यात काय इवढं दत्या . . . पैका दौलत अासल की अंगावर दिसणारच " आत्याबाई तितक्याच शांततेत बोलत होत्या .
" तू समजलीस नाय म्हातारे . .लई पुढं गेलाय तो माझ्यापासन तीन तीन पोर सुना ,नातवंड " प्रतापराव जोरात झोका घेत बोलले .
" तूझा वंश बी वाढला असता की रं जर पयल्याच बाळंतपणात बायकूला विहरीत ढकलून दिल नसतस " आत्यांच बोलण ऐकून प्रतापरावांनी पाय जमिनीला लावले . झोके थांबले ते तडक उठून उभे राहिले .
" हा मारलं तिला तर . .आक्के तू त्याला आमच्यासंग तोलतेस व्हय . .हुता कोण तो ?? . . .आमच्या जमिनीत त्याचा बाप राबायचा आमच्या बानं जमीन दिली म्हणून नाय तर आज काय हुता त्यो ?? " आत्याबाईंकडे रागात बघत ते बोलत होते .
" आरं परतापा तूझा बा रंगाराव खोत त्यांन काय फुकटात जमीन दिली व्हती व्हय त्याला . . .त्याच्या बान वाचवल नसतं तर तिथंच जंगलात सडून मेला असता . . .तूझ्या बानं अर्धी दौलत दिली आसती तरी कमी व्हती पन दिला काय जमिनीचा येक तुकडा " आत्याही त्यांच्याकडे पाहत तावातावाने बोलल्या .
" आग पन त्या एका तुकड्यातनं त्यांन इवढी दौलत कमावली तेवढं आपल्या खानदानात कोणी कमावल हुतं का ?? "
" परतापा परत्येकाच रगात तूझ्यावाणी नसतं . . . . . . कोणी कमावल्या बिगर तू असा पैशाच्या राशीत लोळतोस व्हय . . . .खानदानात कशाला ला तूझ्या थोरल्या भावाचं घे की काही रोकड घेऊन शहरात गेला व्हता दोन वर्षात धंद्यातून तिप्पटीन पैका कमावला तो आता आसता तर त्या सदाशिवच्या चौपटीन दौलत आसती आपल्याकड पर तू त्याच्याकडनं काय शिकायच दूरच . . . . उलट कसली ती यिद्या करून त्याचा खून केलास " आत्या सुस्कारा टाकत बोलल्या .
प्रतापराव हात मागे घेऊन ओसरीच्या कडेला आले आणि बोलले
" हा केला म्या खून त्याचा सगळी दौलत मला हवी व्हती काय चुकलं माझ "
" दौलत घेतलीस पर काय केलस तीच . . . .उधळलिसच ना बाया फिरवल्यास ,दारू ,जुगार काय न्हाई करायाच बाकी ठेवलस सांग . . . तूझ्या बा च्या वेळी पंचक्रोशी बाहेर बी आपली सावकारी चालायची त्या काळंची अर्धी अधिक जमीन तरी आता हाय का ?? तूझ्या कारकिर्दीत जी जमीन घराण्यात आली ती समदी लूबाडलेली . . .कसले ते होम हवन,बळी ,लोकांना भीती घालण काय ,कसल्या त्या भयानक यिद्या " आत्या हात झटकत बोलत होत्या .
" अाक्के माझी पाप सांगाया ईचारल नव्हतं तुला . . . . .काय करू त्ये सांग हे आसच चालू राह्याल तर चार वर्षांनी खोतास्नी कोण ईचारनार बी न्हाय "
" म्या जीत्ती अस स्तोवर हे शक्य न्हाय तेच करायाच जे आत्तापातूर केलाय "
" म्हंजी त्यास्नी बी भीती घालायाची ??" दत्तूने मधेच विचारलं .
" ह्याला भीती घालून काय व्हणार न्हाय ह्याचा मूडदाच पडाया हवा एकदा का हा गेला की मग त्याच्या पोरांचे आपआपसात झगडे लावून त्याच्या घराचे तीन तुकडे करणं माझ्यासाठी काय मुश्किल काम न्हाय " प्रतापराव हातावर हात चोळत बोलले .
" मार्तंडला सांगावा धाडा ह्ये काम त्योच करू शकतो " आत्यानी सुचवल .
" कोण मार्तंड त्यो तर कवापासून परागंदाच हाय गावातना . . . . हाकल्यापासून पुण्यांदा कधी दिसला न्हाय " दत्ता लगेच म्हणाला .
" जित्ता हाय की मेला तेबी ठाव न्हाय " लगोलग प्रतापरावही बोलले .
" असली माणसं सहजासहजी मरत न्हाईत शोध घ्या म्हंजी सापडलं " आत्या बोलत होत्या .
" काय दत्ता जमेल की न्हाई " दत्तूकडे पाहत प्रतापराव बोलले .
" जमल पर . . .ते पैक जरा जास्त . . . . . ." दत्ता प्रतापरावांच्या हातातल्या अंगठ्यांकडे पाहत म्हणाला .
त्यांना दत्ताच्या लालसेपणाची पूर्ण कल्पना होती त्यांनी हातातली अंगठी काढून दत्ताकडे भिरकावली . मालकाने फेकलेली चपाती कुत्र्याने उडी मारून तोंडात पकडावी तशी ती अंगठी त्याने हवेतच झेलली .
" काम लवकर पूरं करा . . . .निघा आता " त्या सरशी एका हातात अंगठी नाचवत दुसऱ्या हाताने धोतर सावरत दत्तू गेला .
" आक्के आजकाल नोकर माणसांपुढंपण तू आम्हाला लई बोलतेस " प्रतापराव लटक्या रागात बोलले .
" मग मी काय घाबरते व्हय तुला "
" घाबर म्हातारे घाबर . . . मी काय काय केलया माहीत हाय न तुला "
" व्हय माहीत हाय . . . . . ज्या गोष्टी म्याच शिकवल्यात त्याची मला भीती घालू नगंस . . .मी व्हते म्हणून . . .नायतर ईश देऊन सवताच्या बापाचा मूडदा पाडायची तरी हिम्मत व्हती का तूझ्यात ?? " बोलताना आत्यांच्या चेहऱ्यावर थोडं मिश्किल हसू होतं .
" हे बाकी खर हाय . . .हे बाकी खर हाय " बोलून प्रतापरावांच्या तोंडून विक्रुत हास्य बाहेर पडलं त्याचे ध्वनि कितीतरी वेळ वाड्यात घुमत राहिले .
वाड्यासमोर गाड्या येऊन थांबल्या त्या बरोबर दोन छोटी मूलं टूनकन गाडीतून उडी मारून घरात शिरली त्या पाठोपाठ सदाशिवरावांच कुटुंब आत आलं त्यांचा वाडाही प्रतापरावांच्या तोलामोलाचा होता ते दिवाणखाण्यात येऊन बसले . प्रत्येकाच्या हातातोंडात मिठाई होती .बाजूला त्यांच्या पत्नी शकुंतला बाई बसल्या होत्या अशा आनंदच्या क्षणीही त्यांच्या चेहऱ्यावर नाराजी दिसत होती .
" शकुंतलाबाई काय झाल आजच्या दिशीही अशी नाराजी ?? " सदाशिव रावांनी विचारलं .
" नाराज नाय व्हायचं तर काय करायाच प्रत्येक समारंभात त्या परतापरावाला आमंत्रण द्यायलाच हवं का ?? "
" आग अस बोलून कस चाललं त्यांचे लई उपकार हाईत आपल्यावर " सदाशिवराव समजावणीच्या सूरात बोलले .
" त्यांचे उपकार आपली मेहनत कायच नाय का इतकी वरीस राबलो ते कायच न्हाई ?? कसा तिरसठावाणी बोलत होता बघितलं न्हवं "
" हा बाबा मलाबी नाय आवडलं बोलणं त्याचं . . . .तो जळतूया तुमच्यावर " बाजूला बसलेले थोरले चिरंजीवही आईला दुजोरा देत बोलले .
" आर असतूया एकेकाचा सभाव म्हणून काय संबध तोडायचे व्हय " सदाशिवराव दोघांना समजावत बोलले .
" तुम्हास्नी लई हौस संबध जपायची " शकुंतलाबाई नाराजीने बोलल्या .
" ते समंद जाऊदे आधी जेवणाचं बघा लई भूका लागल्यात " म्हणत त्यांनी शकुंतलाबाईंना आत पिटाळलं आणि विषय संपवला .
सदाशिवरावांचा स्वभाव तसा भोळसटच होता पण शकुंतलाबाईं चाणाक्ष होत्या प्रतापरावांची कीर्ति त्यांना चांगलीच ठावूक होती आणि ऐक चांगलाच पूर्वानूभवही होता .
साधारण पाच वर्षापुर्वीची गोष्ट असावी .सदाशिवराव आणि तिघेही चिरंजीव सकाळीच कारखान्याच्या नव्या मशनरीची व्यवहार करायला बाहेर गेलेले चार पाच दिवसांनी येणार होते घरात फक्त त्या ,काही नोकर आणि दोन सुना घरात होत्या . धाकट्याच लग्न झाल नव्हतं त्या संध्याकाळी कधी नव्हे ते प्रतापराव घरी आले नेमक्या त्याच वेळी त्या देवळात गेलेल्या दोन्ही सुनांशी गोडगोड बोलून सदाशिवराव कुठे गेलेत,किती दिवस मुक्काम आहे सगळी माहिती काढून गेले त्याच्या दुसऱ्याच दिवशी गावात बातमी पसरली की देवाळातले देवाचे दागिने चोरीला गेलेत .त्या दुपारीच जेवणं झाली सगळे आपआपल्या खोलीत पहुडले होते .शकुंतलाबाई जाग्याच होत्या त्यांच खिडकीतून सहज बाहेर लक्ष गेल संरक्षक भिंतीच्या मागच्या दारातून कोणी इसम चोर पावलंानी बाहेर जात होता .बाहेर अजून एक इसम उभा होता तो बाहेरचा प्रतापरावांचा कारकून दत्तू आहे हे त्यांनी लगेच ओळखलं त्या तडक त्या दारापाशी आल्या तो पर्यंत ते दोघे निघून गेले होते . आत डाव्या अंगाला अवजारांची खोली होती तीचं दार उघड होतं त्यांच्या मनात शंकेची पाल चूकचुकली त्यांनी आत जाऊन पाहिलं आत सगळ व्यवस्थित होतं फक्त कोपऱ्यात लाल पोटली दिसत होती त्यात काही तरी बांधलं होतं त्यांनी खोलून पाहिलं तर त्यांना धक्काच बसला . आत तेच जे चोरीला गेलेले देवळातले दागिने होते सगळा डाव त्यांच्या पूर्ण लक्षात आला . सदाशिवरावांच्या घरात हे सापडलं म्हणजे त्यांच्यावरच चोरीचा आळ येणार मग आतापर्यंत कमावलेली सगळी इभ्रत धुळीला मिळणार त्या मटकन खाली बसल्या काय कराव त्यांना सुचत नव्हतं .काहीही करून हे घरातून बाहेर काढायला हव होत पण कस नोकरांकडून बाहेर काढायला गेल तर बोंबाबोंब होणार स्वतः घेऊन बाहेर गेल तर बाहेर प्रतापरावांची माणसं याच गोष्टीची वाट बघत दबा धरून बसलेली असणार .आपण अस काय केलं म्हणजे आयतेच त्यांच्या तावडीत चोर म्हणून सापडू .वेळ कमी होता जे काही करायच ते लवकर करायला हवं होत जितक्या जास्त वेळ त्या घरात राहणार तितका जिवाला घोर होता . बाजूला शेपूट हलवत राजा उभा होता त्याने कदाचित मालकिनीच्या मनातलं जाणलं असाव तो पोटली जवळ जाऊन ती हुंगू लागला तो क्षणार्धात ती तोंडात पकडून मागच्या दाराने बाहेर निघून गेला . शकुंतलाबाईंनी त्याला थांबवले नाही तितक्यात वाड्यातून गडबड ऐकू आली एका नोकराने धावत येऊन पोलीस आल्याचं सांगितलं शकुंतलाबाईंनी वाड्याच्या पुढच्या भागात येऊन पाहिल तर खरचं पोलीस आले होते तेही पूर्ण तयारीनिशी त्यांना कोणी टिप दिली असावी त्यांनी पूर्ण वाड्याची झडती घेतली पण त्यांच्या हाती मात्र काही लागलं नाही . त्याच संध्याकाळी प्रतापरावाच्या एका नोकराच्या खोपटा मागे ते दागिने सापडले तो कुठे पळून गेला कळल नाही .गावकऱ्यांनी त्याच्या खोपटाला आग लावून दिली ते जर आपल्या वाड्यात सापडले असते तर काय झाल असतं या विचाराने अजूनही त्यांच्या अंगावर शहारे येतात त्या दिवशी त्यांनी जे पाहिलं ते त्यांनी सदाशिवरावांना सांगितल नाही पण प्रतापरावांना त्या पुरतं ओळखून होत्या .
मध्यरात्र उलटून गेली होती .सगळ गाव निद्राधीन झाल होतं .खोतांच्या वाड्याच्या ओसरीवरचे चार रॉकेलचे दिवे अजूनही जळत होते . झोपाळा कर्रकर्र आवाज करत झोके घेत होता त्याच्या जोडीला सुपारी कातरण्याचा आवाजही येत होता .प्रतापराव झोपळ्यावर बसून पान बनवत होते ओसरीच्या पुढे चार फूट खाली पडवी सुरू होत होती तिथे एक माणूस उभा होता .कुश बांधा ,उघडाबंब देह त्या वर भस्माचे पट्टे ,कमरेपासून गुढग्यापर्यंत काळा पंचा , एका पायात जाड तोडा ,गळ्यात मोठ्यामोठ्या मण्यांच्या माळा ,वाढलेल्या दाढी मिश्या पाठीवर रुळणाऱ्या जटा ,हातात गोल गोल वेटोळे असलेली काठी तो मार्तंड होता दत्ताने फार लवकर त्याला हुडकूण काढलं होत .
" मालक मला बोलावलंत काय काम हुतं ? " त्याने खरखरीत आवाजात विचारलं .
" आरं काम असल्या बिगर तुला बोलावण धाडु व्हय . . . .एकाच काम फत्ते करायाचय कायमचं . . ."
" जीव घ्यायाचाय . . .?? ईचार करा एकदा तो सैतान चाळवला की जीव घेतल्या बिगर माघारी जायचा न्हाय " तो प्रतापरावांना सावध करत म्हणाला .
आपण ही कथा आतापर्यंत जास्तीच जास्त पाहिलीच असेल आणि आशा आहे आपल्याला ही आवडली असेल . या कथेत पुढे काय होत हे आपल्याला जाणून घ्यायचं असेल तर आपल्याला संपूर्ण कथा वाचावी लागेल .पूर्ण कथा वाचण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा किंवा amazon kindle वेबसाईटवर जाऊन “प्रतिबिंब “ किंवा writer abhi टाईप करून पूर्ण पुस्तक प्राप्त करा
https://www.amazon.com/%E0%A4%AA%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%A4%E0%A4%BF%E0%A4%AC%E0%A4%BF%E0%A4%82%E0%A4%AC-%E0%A4%97%E0%A5%82%E0%A4%A2%E0%A4%95%E0%A4%A5%E0%A4%BE-Marathi-%E0%A4%85%E0%A4%AD%E0%A4%BF%E0%A4%B7%E0%A5%87%E0%A4%95-%E0%A4%A6%E0%A4%B3%E0%A4%B5%E0%A5%80-ebook/dp/B086R4CGP1/ref=sr_1_2?dchild=1&keywords=abhishek+dalvi&qid=1586019155&s=digital-text&sr=1-2
... प्रतिबिंब ...
" हा काका कुठं पर्यंत पोचलात . . . . . . . .हो हो तिकडून डावीकडे . . . . .हो हो सरळ सरळ . . . . . .तिथे येऊन कोणालाही विचारा निर्मला कॉम्प्लेक्स कोणीही सांगेल ओके ठीक आहे ठीक आहे " नशीब पोचले एकदाचे बाबांनी काल रात्रीपासून माझ्या मागे घोषा लावला होता . छोटे काका गाडीत बसले का बघ . . .गाडी कुठं पर्यंत आली असेल रे . . .सकाळी कधी पर्यंत गाडी स्टेशनला लागेल . . . .त्यांना पत्ता बरोबर सांगितलास ना . .शेवटी सकाळी दादाला स्टेशनवर पाठवल तरी व्हायची ती चुकामूक झालीच .मला एक कळत नाही बाबांना सगळ्या नातेवाईकांना
If you are looking for a good book horror, you should visit our website. Electronic library is gaining popularity. Influenced by modern technology and the advent of new gadgets, people are increasingly turning to electronic libraries because it allows them to read online everywhere . Every reader thanks to his smartphone, laptop or computer, can visit our website at any time. Reading ebooks help people to make good use of free time. Our elibrary has a huge selection of genres for every taste and request.
Comments (0)