कदाचित हेच आहे प्रेम by अभिषेक दळवी (novel24 .TXT) 📖
- Author: अभिषेक दळवी
Book online «कदाचित हेच आहे प्रेम by अभिषेक दळवी (novel24 .TXT) 📖». Author अभिषेक दळवी
" बाहेर जाशील ना तेव्हा घरच्या अन्नाची कीमत कळेल ."
खरच ती कीमत आज मला कळत होती .मेसवाले ज्या पदार्थाला वरण म्हणत होते ते भातावर ओतून मी चार घास पोटात ढकलले कारण अजून काही पर्यायच नव्हता .बाहेर कुठे तरी प्रायव्हेट मेस लावावी लागणारच होती .अस जेवण नेहमी खाणं शक्य नव्हतं .
दिवसभरच्या इतक्या कटकटीनंतर बेडवर येऊन आडवा झालो पण माझ नशीबच फुटकं डोळे बंद करणार तितक्यात लाईट गेली .माझा बेड खिडकीजवळ होता ही एक गोष्ट चांगली होती .खिडकीतून थंड हवा येत होती . होस्टेलच्या मागे माझ्या रूमच्या खिडकी समोर एक छोटा बंगला होता .कदाचित त्यांनी बागेत फूलझाड लावली होती . तिथल्या फुलांचा मंद सुगंध खिडकीतून येणाऱ्या हवे सोबत खोलीत दरवळत होता .त्या थंड हवेने आणि त्या सुगंधाने माझा दिवसभराचा सगळा क्षीण कुठच्या कुठे निघून गेला .संध्याकाळी झोपून उठलो होतो त्यामुळे लगेच झोप काही येणार नव्हती मला आता तो सकाळचा प्रसंग आठवत होता जेव्हा मी चुकून त्या बी एस्सीच्या क्लासमध्ये जाऊन बसलो होतो आणि माझ्या बाजूला ती गुलाबी सलवार घातलेली मुलगी बसली होती . किती सुंदर होती. तीच नाव मी विसरलो कदाचित श्रुती होत ...नाही नाही हे तिच्या शेजारच्या मुलीच नाव होत ......स्नेहा नाही .नाही स्मिता .हो स्मिताच नाव होत तीच. स्मिता जहागिरदार ...हो बरोबर हेच नाव होत .जेव्हा सगळे जण माझ्यावर हसत होते तेव्हा ती सुद्धा हसत होती पण तिच्या हसण्याच मला वाईट वाटल नाही . उलट तिच्या त्या खळखळून हसण्याचा आवाज मी कानात साठवून ठेवला होता .शांत वातावरणात किनकिनणाऱ्या नाजुक पैंजणांसारखा तिच्या हसण्याचा आवाज होता .ती पुस्तक वाचताना जेव्हा खुदकन हसली होती तेव्हा तिच्या गालाला पडलेली खळी अजूनही मला आठवत होती .रात्री उशीरापर्यंत मी तिचाच विचार करत होतो त्यातच माझा डोळा कधी लागला मला कळलही नाही .
स्मिता ..........
मला आधीपासूनच फूलांची फार आवड होती .मी ज्या बंगल्यात राहत होते त्याचे मालक म्हणजेच कुलकर्णी काका बाजूच्याच बंगल्यात त्यांच्या पत्नी सोबत राहायचे .हा बंगला त्यांनी त्यांच्या भावासाठी बांधला होता पण तो इथे दोन वर्ष राहून पुढे दिल्लीला शिफ्ट झाला .मग काकांनी हा बंगला भाड्याने द्यायला सुरुवात केली .
इथे आम्ही आधी पाच मुली रहायचो मी , प्रिया ,कुसुम , ज्योती आणि मोनिका . मोनिका , प्रिया , ज्योती आणि कुसुम बारावीला माझ्याच कॉलेजला होत्या .खर तर बारावीनंतरच शिक्षण जवळच्याच एका छोट्या मोठ्या कॉलेजमधे घेणार होत्या पण मी इथे आल्यावर मामाला सांगून त्यांनासुद्धा माझ्याच कॉलेजला अॅडमिशन घ्यायला मदत केली आणि राहायची सोय माझ्याच बंगल्यात केली .ज्योतीचा आणि माझा आधी छत्तीसचा आकडा होता ती सुद्धा माझ्याच कॉलेजला होती माझ्याच मागच्या बेंचवर बसायची पण कधीच माझ्याशी बोलायची नाही .काही वेळेला मुली मुली किंवा मैत्रिणी मैत्रिणींमधे छोटी मोठी भांडण किंवा ईर्ष्या असते .अर्थात मुलींचा स्वभावच असा असतो छोट्या छोट्या गोष्टी वरून भांडायच रूसवा गेल्यावर पुन्हा एकत्र व्हायच .पण ज्योतीच तस नव्हतं ती माझ्यावर जास्तच नाराज असायची मला हे स्पष्टपणे जाणवायचं मी कित्येक वेळा स्वतः हून तिच्याशी बोलण्याचा प्रयत्न करायचे पण तिचा खडूसपणा काही गेला नाही .ती नेहमीच मला इग्नोर करायची .माझ्या पाठीमागे मुलींसोबत माझ्याबद्दल गॉसिप करायची .मला माझ्या दोन तीन मैत्रिणी सांगायच्या,
" ज्योती तुझ्यावर भरपूर जळते ग . सांभाळून राहा तिच्यापासून ."
मला पण त्यांच बोलण पटायच कारण तिच वागणंच तस होतं .तिचे वडील आमच्या कॉलेजचे प्रिन्सिपल होते .काही कारणांनी त्यांची नोकरी गेली .बाबांची आणि तिच्या वडीलांची ओळख होती . ओळख म्हणजे चमचेगिरी म्हटल तरी चुकीच ठरणार नाही .बाबांच्या वशील्याने दुसऱ्या एका कॉलेजमध्ये त्यांना नोकरी मिळाली .तेव्हापासून तीच अस वागणं थोडं बदललं ती माझ्याशी चांगली वागू लागली .मी इथे राहायला आल्यावर तिच्या वडिलांनी तिला माझ्याच कॉलेजला अॅडमिशन घेऊन दिल आणि तिची राहायची सोय ही माझ्याबरोबरच केली .का कोणास ठावूक पण मला नेहमी वाटायचं तिच्याद्वारे बाबा माझ्यावर नजर ठेऊ पाहत आहेत .कारण माझी फी भरायला जेव्हा बर्वे काका म्हणजेच बाबांचे सेक्रेटरी आलेले तेव्हा त्यांनीच तिची फी आणि तीच इथलं भाड भरलं होत .म्हणून तिच्याशी वागता बोलताना सावध राहावं लागायचं .काही दिवसांनी अजून एक प्राची नावाची मुलगी आमच्यासोबत राहायला आली .ती आमची सिनियर होती .तिनेआमच्याच कॉलेजला लास्टयीअर बी एस्सीला ऍडमिशन घेतलं होतं .तिच्या वडिलांची बदली इथल्या जवळच्या पोलीस स्टेशनला झाली म्हणून तीही त्यांच्या सोबत इथे आली .तिची आई दोन वर्षापूर्वी वारली होती आणि भाऊ बंगलोरला होता त्यामुळे तिच्या घरात ती आणि तिच्या वडिलांशिवाय दुसर कोणी नव्हतं .तिचे वडील पोलीस इन्स्पेक्टर होते त्यांच्या ड्युटीला काही लिमिटस नव्हत्या अशा अनोळखी ठिकाणी तरुण मुलीला एकट ठेवण त्यांना योग्य वाटल नाही म्हणून ते तिच्यासाठी हॉस्टेलमधे रूम पाहत होते . तेव्हाच कॉलेजमध्ये आमची ओळख झाली आणि ती आमच्या बरोबर राहायला तयार झाली .बंगल्यात तीन बेडरूम्स होत्या . ग्राउंडफ्लोरच्यारूममध्ये मोनिका , कूसूम आणि ज्योती राहायच्या .फर्स्ट फ्लोरवरच्या एका रूममध्ये प्राची , प्रिया राहायच्या आणि दुसरा बेडरूम पूर्ण माझाच होता .
आमच्या बंगल्याच्या मागे हॉस्टेलची तीन मजली इमारत होती .बंगल्याची कंपाउंडर वॉल आणि हॉस्टेलच्या कंपाउंड वॉलमधे छोट गटार होतं .त्या गटाराची दुर्गंधी जाणवू नये म्हणून कुलकर्णी काकूंनी बंगल्याच्या आवरात फूल झाडं लावली होती .त्यात एक मोठ चाफ्याच झाड सूद्धा होतं .मला लहानपणापासूनच फुलांची फार आवड होती .मी बागेतल्या फुलांच्या काही कुंड्या माझ्या रूमच्या बाल्कनीत आणून ठेवल्या होत्या . पावसाचे दिवस होते म्हणून बाल्कनीला शेड घातली होती आणि एक झोपाळा ही बांधला होता .संध्याकाळच्या वेळेस झोपाळ्यावर बसून फुलांचा सुगंध घेत पुस्तक वाचायला एक वेगळीच मजा यायची .
अभिमान.......
कॉलेज सुरू झाल्यापासून दिवस किती पटापट निघून जात होते ते कळत ही नव्हत .आज चार महीने उलटून गेले होते . आठवड्याचे चार दिवस प्रॅक्टिकल्स लेक्चर्स आणि दोन दिवस फक्त लेक्चर्स अस शेडयुल असायचं .प्रॅक्टिकलमध्ये वेळ आरामात निघून जायचा पण लेक्चरला जाम बोर व्हायला व्हायचं .ब्रेकनंतरचा पहिला लेक्चर तर फक्त डुलक्या ख़ातच जायचा .एक दोन प्रोफेसर्स होते ज्यांना मुलांना शिकवायच कस याची उत्तम जाण होती .पण काही जण असेही होते जे इतक फालतू शिकवायचे की कोणत्या मूर्खाने त्यांना मास्टर्सची डिग्री देऊन प्रोफेसर केलं अस वाटायच .एक प्रोफ़ेसर होता जो आम्हाला मॅथ्थस शिकवायला यायचा तो सर्व प्रॉब्लेम अक्षरश वहीत लिहून आणायचा आणि बोर्डवर फक्त कॉपी पेस्ट करायचा .त्याला कोणता डाउट विचारल्यावर त्यांच तोंड बघण्यासारख असायचं .त्याच्या लेक्चरला आम्ही शेवटच्या बेंचवर जाऊन टाईमपास करायचो .सुरूवातीला आम्ही पकडलो तर क्लासच्या बाहेर पाठवायचा मग आम्हीही मुद्दाम त्याला डाउट विचारून विचारून हैरान करायचो .मग त्यालाही कळून चुकलं की आम्ही त्याच्यापेक्षा शहाणे आहोत .अजून एक प्रोफ़ेसर होता तो ही जाम बोर करायचा मी आधीही त्यांचा उल्लेख केलाय .केसांचा चंपू , मळकट हाफशर्ट , फॉर्मल पॅन्ट त्याखाली स्पोर्टस शूज एकंदरीत व्यक्तिमत्वावरून कोणीही त्याला प्रोफ़ेसर म्हणणार नाही .हो पण शिपाई मात्र आवर्जून म्हणतील .तो शिकवताना बोर तर करायचाच पण खडुसही इतका होता की आम्ही त्यांना हिटलर म्हणायचो .त्याला अस वाटायच आम्ही मूल म्हणजे त्यांच्या हातातली कतपुतली आहोत .त्याची अपेक्षा असायची त्यांच्या लेक्चरच्या पाच मिनट आधी आम्ही सर्वानी क्लासमध्ये प्रेसेंट राहायच ,असाईंटमेंट तो सांगेल तशीच पूर्ण करायची .अर्थात आम्ही सर्व एकमेकांची कॉपी करायचो ती गोष्ट वेगळी होती. बर तो त्याच मुलांबाबतीत चांगला होता जे त्याची चमचे होते .जर कोणता मुलगा चुकून कधी उलटून बोलला तर तर तो कायमचा त्याच्या नजरेत बसायचा .आम्ही अस ऐकलं होतं त्या प्रोफ़ेसरने काही मुलांना मुद्दाम ड्रॉपही लावला होता .
लहानपणी मम्मी मला नेहमी सांगायची .गुरु शिष्याच नात हे एकलव्य आणि द्रोणाचार्यासारख असावं .एका धनुधाऱ्याच्या अंगठ्यावरच त्याचा निशाना अवलंबून असतो .एकलव्याने आपल्या गुरूला स्वतःचा अंगठा म्हणजे त्याच जीवनच गुरुदक्षिणा म्हणून दिली होती .लहानपणी ही गोष्ट मला फार आवडायची पण मोठ झाल्यावर मला खर सत्य कळल एकलव्याने आपला अंगठा स्वखुशीने दिला नव्हता तर द्रोणाचार्यांनी त्या कडे तो मुद्दाम मागीतला होता कारण एकलव्य त्यांचा प्रिय शिष्य अर्जुनाच्या पुढे जाऊ नये .हळुहळु मला एक गोष्ट लक्षात येत होती .आजच्या जगातही असे द्रोणाचार्य आहेत जे स्वतःच्या अहंकारासाठी अंगठा काय गळा कापायलासुद्धा मागेपुढे पाहत नाही म्हणूनच मला त्या प्रोफेसर हिटलरचा मला फार राग यायचा .
एके दिवशी लायब्ररीत आम्ही बसलो असताना विकीने हा विषय काढलाच .
" हा हिटलर आजकाल जरा जास्तच करतोय ." विकी बोलला .असही आम्ही त्याला हिटलरच म्हणायचो .
" का रे काय केल त्याने ?" देवने विचारलं .
" अरे दीक्षित मॅमची टेस्ट होती त्याच्या एक दिवस आधी मी गोडबोले सरांचा लेक्चर बंक केला होता. ते किती बोर करतात माहीत आहे ना म्हणून लेक्चर बंक करून लायब्ररीत येऊन आम्ही टेस्टची तयारी करत होतो .तर आम्हाला येऊन बोलतो ' तुम्ही कॉलेजला आल्यावर प्रत्येक लेक्चर अटेंड करायचा नाहीतर तुमची प्रिंसीपलकडे कंपलेंट करीन ' ही काय ह्याची जबरदस्ती आपण इथे शिकायला येतो ना ज्यांची लायकी नाही शिकवायाची त्यांचे लेक्चर आपण का अटेंड करायचे ?? " विकी बोलला .विकी तसा थोडा फटकळच होता जे काही मनात असायचं ते स्पष्टपणे बोलून टाकायचा .
" बरोबर बोलतोय विकी .ह्याच्या चमच्यांना हा प्रेक्टिकलमधे चांगले मार्क्स देणार आणि आपल्याला त्याच्या अर्धे " मीही बोललो .
" तुम्ही दोघ त्याचा नका इतका विचार करू रे .त्याने आधी दोघा तिघांना ड्रॉप लावले माहीत आहे ना ." देव बोलला .देव तसा भित्राच होता .
" म्हणून तर काही करू शकत नाही ना ." मी बोललो .
" एक गोष्ट आपण करू शकतो ." विकी बोलला .
" काय ??"
विकी सांगू लागला .
" आमच्या कॉलेजमध्ये एक किस्सा झाला होता .आमच्या एका खडूस टीचरला आमच्या सीनियर्सनी एकदा , संध्याकाळी बाथरूममध्ये बंद केलं होतं ."
" बर मग, तुझ्या मनात काय आहे ?" मी विचारलं.
" आपणही तसच करू शकतो ." विकी बोलला .
" ए वेडा आहेस का ? मला नाही जमणार . पकडलो गेलो तर रस्टिकेट होऊ " देव म्हणाला .देव खरच खूप भित्रा होता तो या गोष्टीसाठी अजिबात तयार होणार नाही हे आमच्या लक्षात आल .
" बर ठीक आहे प्लॅन कॅन्सल ओके " त्याच्या समाधानासाठी विकी बोलला .पण तो गेल्यानंतर विकीने मला पूर्ण प्लॅन सांगितला .मी ही आधी थोडा घाबरलो आणि नंतर तयार झालो .
मी आणि विकी आम्ही त्याच्यावर काही दिवस नजर ठेवली .नोकियाचा मोबाईल नेहमी हिटलरच्या गळ्यात असायचा आणि बाथरूममध्ये वॉशबेसिनमधे तोंड धूताना मोबाईल बाजूला काढून ठेवायची त्याची सवय होती ती आम्हाला माहिती पडली आणि एका संध्याकाळी तो वॉशबेसिनमध्ये तोंड धूत असताना त्याच्या याच सवयीचा फायदा घेऊन विकीने त्याचा मोबाईल घेतला आणि आम्ही दोघांनी वॉशरूमला बाहेरून कड़ी घालून घेतली .संध्याकाळची वेळ होती .कॉलेज जवळ जवळ पूर्ण बंद झाल होत. गेटवर फक्त दोन वॉचमन होते पण थर्डफ्लोअरवरच्या वॉशरूममधून येणारा आवाज गेटजवळच्या वॉचमनपर्यंत पोहोचण्याची शक्यताच नव्हती आणि त्याचा मोबाईलही आमच्याकडेच होता . तश्या बाथरूमला खिडक्या होत्याच त्यामुळे त्याच्या गूदमरण्याचा प्रश्न येत नव्हता .आम्हाला फक्त त्याला अद्दल घडवायची होती त्यांच्या जिवाशी खेळण्याची आमची बिल्कुल इच्छा नव्हती .गेटमधून बाहेर निघालो तर वॉचमनच्या नजरेत यायचा धोका होता म्हणून आम्ही बाथरूमची लाईट बंद करून कॉलेजच्या मागच्या कंपाउंड वॉलवरून उड्या मारून हॉस्टेलमध्ये आलो .
हॉस्टेलमध्ये येईपर्यंत आम्ही घामाघूम झालो .रूमवर आल्या आल्या आम्ही कुठे गेलो होतो देवने विचारलचं .त्याला संशय आला असावा .आम्ही काहीतरी कारण देऊन त्याला गप्प केलं .दुसऱ्या दिवशी शिपायाने दरवाजा उघडला तेव्हा हिटलर बाहेर आला .मग पूर्ण कॉलेजमधे एकच चर्चा होती की हिटलरला रात्रभर बाथरूममध्ये अडकला होता . साधारणपणे अशा घटना जेव्हा घडतात तेव्हा हे कोणी केल , का केल अशी चर्चा रंगते पण तेव्हा कॉलेजमधे " जे कोणी केल ते चांगलच केल , हिटलरला त्याची जागा दाखवून द्यायलाच हवी होती ." अशी चर्चा चालू होती .चौकशी होऊन सुद्धा त्याला बाथरूममध्ये अडकवण्यात कोणाचा हात होता हे शेवटपर्यंत कळल नाही .देव आम्हाला अधून मधून विचारायचा
" खर सांगा हे तुम्हीच केलय ना . त्या दिवशी संध्याकाळी तुम्ही कुठेतरी गेला होतात ?"
शेवटी त्याला खर सांगावंच लागलं या घटनेनंतर हिटलर भीतीने का होईना पण सुधारला .
इथे आल्यापासून माझ्यात फार बदल झाला होता .एक वर्षापूर्वीचा अभिमान आणि आताचा अभिमान यात फार फरक होता .बारावीपर्यंत मी पहिला बेंच कधी सोडला नव्हता किंवा कोणता लेक्चर बंक केला नव्हता .इथे आल्यावर मी कधीच पहिल्या बेंचवर बसलो नाही आणि लेक्चर बंक करायच म्हणाल्यास एक खानविलकर नावाच्या मॅम होत्या त्यांच्या लेक्चर ब्रेकनंतरच असायचा .आम्हाला यायला पाच मिनिट जरी उशीर झाला तरी म्हणायच्या,
" मी तुमची अटेंडस लावते पण क्लासमधे मात्र बसायला देणार नाही बाहेर उभे राहा ."
मग आम्ही मुद्दाम दहा मिनिट लेट जायचो .त्या सवयी प्रमाणे अटेंडस लावायच्या पण आम्हाला बसू द्यायच्या नाही मग आम्ही सरळ फूटबॉल खेळायला जायचो .
खर सांगायच तर इथे आल्यावर मी पूर्वी सारखा अभ्यास कधी
Reading books romantic stories you will plunge into the world of feelings and love. Most of the time the story ends happily. Very interesting and informative to read books historical romance novels to feel the atmosphere of that time.
Comments (0)