कदाचित हेच आहे प्रेम by अभिषेक दळवी (novel24 .TXT) 📖
- Author: अभिषेक दळवी
Book online «कदाचित हेच आहे प्रेम by अभिषेक दळवी (novel24 .TXT) 📖». Author अभिषेक दळवी
घरी तर आम्ही मुली फार मजा करायचो .घरकामाला येणाऱ्या मावशी संध्याकाळी सात वाजता सगळा स्वयंपाक करून निघून जायच्या .मग पूर्ण घर आमच्या ताब्यात असायचं .मग आमची मस्ती सुरू व्हायची .शेवटी घरात राहून राहून तरी काय करणार कारण संध्याकाळी आठ नंतर बंगल्याच्या बाहेर जायला आम्हाला कुलकर्णी काकूंनी मनाई केली होती .अर्थात त्यांचही बरोबरच होतं आजुबाजुची जागा तशी सुनसान होती म्हणून आमच्यासारख्या तरुण मुलींना त्या रात्री बाहेर सोडू शकत नव्हत्या .पण मग म्हणून आम्हीच घरातच काही ना काही टाईमपास करायचो .घरी एक जुना टीव्ही होता पण त्यावर सगळे बोरिंग चॅनेल दिसायचे .फक्त शनिवारी रात्री अकरा वाजता त्यावर एक हॉरर सिरीयल असायची .सर्व लाईट्स ऑफ करून घाबरत घाबरत ती सिरीयल पाहायला आम्हाला फार मजा यायची .
एकदा रात्री अकरा वाजता आम्हाला खिर खायची ईश्चा झाली .प्रत्येकीला खिरीची वेगवेगळी रेसिपी माहीत होती .साढ़ेअकरा पर्यंत आम्ही एक रेसिपी फायनल करून पावणेबारापर्यंत खिरीचा कूकर बर्नरवर ठेवला आणि हॉलमधे येऊन बसलो .कूकर खराब होता की आम्ही तो नीट बंद केला नाही ते माहीत नाही पण किचनमधून जोराचा आवाज आला .आम्ही जाऊन पाहतो तर कूकर जमिनीवर पडला होता आणि किचनच्या चारही भिंतीवर खिर उड़ाली होती . आवाजही मोठा झाला होता रात्री बारा वाजता आजुबाजुचे सर्व लोक आमच्या घरात जमले तेव्हा आम्हाला कुलकर्णी काकूंचा फार ओरडा खावा लागला होता .
कुलकर्णी काकू व्हेजिटेरियन होत्या म्हणून आम्हालाही घरात नॉनवेज खायला बंदी होती .आम्ही थर्टी फर्स्ट नाईट सेलिब्रेट करायचं ठरवलं होतं त्या दिवशी कुलकर्णी काकूंच्या घरातले सर्व संध्याकाळी त्यांच्या एका पाहुण्याकडे गेले होते ते सरळ सकाळीच परत येणार होते . तेव्हा आम्ही चिकन बनवायचा प्लॅन केला .दोन किलो चिकन आणलं .मी , प्राची आणि कुसुमने चिकन ग्रेव्ही बनवायला सुरुवात केली .एका तासाने चिकन शिजल्याचा खमंग वास हवेत दरवळू लागला .तितक्यात आम्हाला काकूंच्या बंगल्याची लाईट ऑन झालेली दिसली त्या घरी परत आल्या होत्या . आम्ही काढलेल्या माहितीप्रमाणे त्या सकाळीच येणार होत्या त्या नुसार आम्ही सर्व प्लॅनिंग केल होत .पण काही कारणामुळे त्या लवकर आल्या होत्या आणि तिथेच प्रॉब्लेम झाला त्यांना चिकनचा वास आला .आजूबाजूला जास्त व्हेजिटेरियन लोक होती त्या मुळे संशय सरळ आमच्यावरच आला .मी किचनमधे होते तितक्यात दारावर थाप पडली . प्राचीने पिनहोलमधून बाहेर पाहील आणि आम्हाला सांगितल कुलकर्णी काकू आल्यात .ते ऐकून आमची सर्वांची हवा टाईट झाली .चिकन घरात कुठे लपवू शकत नव्हतो काकूंनी सहज शोधल असत आणि कचऱ्याचा डबाही मेन डोअरजवळ होता आणि तिथेच काकू उभ्या होत्या .प्रियाने सगळ चिकन एका पिशवीत ओतून घेतलं आणि मागच्या दाराने बंगल्याच्या गार्डनमध्ये गेली .मी लगेच चिकन ग्रेव्ही बनवलेलं भांड धुवून ठेवलं आणि दरवाजा उघडला .कुलकर्णी काकूंनी अख्ख घर शोधल पण त्यांना काहीही नॉनव्हेज सापडल नाही. पण त्या मागच्या दाराने बागेत गेल्या तेव्हा मात्र मला फार भीती वाटायला लागली कारण प्रिया चिकन घेऊन तिकडेच गेली होती . पण काकूंना तिथेही काही सापडल नाही त्या चिकनच काय केल त्या बद्दल मी प्रियाला विचारलं .तेव्हा तिने,
" डोंट वॉरी .....चोरी करके सबूत मिटाना तो हमारे बाएँ हाथ का खेल है ।" असा ऐटीत डायलॉग मारला .
सकाळी उठल्यावर आमच्या बंगल्याच्या डावीकडे असलेल्या बंगल्यातून रागाने ओरडण्याचा आवाज येऊ लागला .त्यांच्या बागेत कोणी तरी चिकन टाकलं होत म्हणून त्या बंगल्यातली लोक रागावली होती ते पाहून आम्ही सर्व प्रियाकडे पाहू लागलो तेव्हा तिने,
" अजून काही ऑप्शनच नव्हता यार .म्हणून घाईघाईत मी ग्रेव्हीची पिशवी कंपाउंड वॉलवरून फेकून दिली ती त्यांच्या बागेत पडली ." खाली मान घालून तिने उत्तर दिल .
" चोरी करके सबूत मिटाना हमारे बाएँ हाथ का खेल है ।" रात्री असा डायलॉग मारणारी रात्रीची प्रिया आणि आताची प्रिया पाहून आम्हाला फार हसू येत होत .
बघता बघता आमची सेकंड सेमीस्टरही संपली .मला सुट्टी सुरू झाल्यावर मी माझ्या घरी आले .ज्या दिवशी मी घरी आले त्याच दिवशी संध्याकाळी बाबा माझ्या रूममध्ये आले .
" कस चाललय कॉलेज ??"
" चांगल चाललय ." मी म्हणाले .
" प्रताप विचारत असतो त्याची होणारी बायको कधी जाणार त्याच्याकडे ??" बाबांनी विचारलं .
प्रतापच नाव ऐकून माझा मूडच ऑफ झाला .
" मी काय म्हणतो सोनू .कशाला आता अजून शिक्षण वैगरे, आपल्याला काय नोकरी वैगरे करायची आहे का ??
नाही ना .मग सोडून दे की कॉलेज .दोन महिन्यांनी मस्तपैकी लग्न लावून देतो तुझ .काय चालेल ना ??" बाबांनी विचारल .ते गोड गोड बोलून मला कॉलेज सोडून लग्न करण्यासाठी माझ ब्रेनवॉशिंग करत होते .पण मी ही हार माननार नव्हते .मामामुळे मुश्कीलीने मला ही तीन वर्ष मिळाली होती ती मला गमवायची नव्हती .
" बाबा फक्त दोन वर्ष बाकी आहेत .मग मी करते ना लग्न ." मान खाली घालून मी रिक्वेस्ट केली .
मी नेहमी बाबांशी बोलताना मान खाली घालूनच बोलायचे मला त्यांची भीती वाटायची .बाबा जेव्हा समोरच्याकडे आपल काही काम असेल तेव्हाच गोडगोड बोलायचे नाहीतर त्यांचा रागीट स्वभाव मला चांगलाच माहीत होता .आताही मी त्यांच्याकडे पाहिल तेव्हा माझ उत्तर ऐकून त्यांचा चेहरा रागाने लाल झालेला होता .ते पुन्हा खोट हास्य ओठांवर आणून गोड गोड बोलत मला समजवू लागले .
" उद्या सकाळी प्रताप आपल्या घरी येणार आहेत तुला फिरायला न्यायला .
काय म्हणता तुम्ही त्याला ......डेट ना .....डेटला न्यायला येणार आहे .
त्यांच्या बरोबर दिवसभर डेटला जा , मजा कर नंतर बघ तूच म्हणशील ' बाबा हे कॉलेज वैगरे बस झालं आता माझ लग्न लावून द्या .' "
प्रताप येतोय हे ऐकून माझ्या नसांनसातून एक भीतीची लहर उमटून गेली .प्रतापने आधी एकदा मला फिरायला नेल होत तो प्रसंग मला अजूनही आठवतो .तो बाबांना विचारून मला जीपमधून गावा मागच्या किल्याजवळ घेऊन गेला होता. त्या किल्ल्याजवळ सगळा जंगलाचा सुनसान भाग होता अशा ठिकाणी तो मला का घेऊन आला हे मला समजत नव्हत .तो मला आत जंगलात घेऊन जाऊ लागला मी अशा ठिकाणी जायला स्पष्ट नकार दिला , मग तो मला समजवू लागला मी ऐकत नाही म्हटल्यावर मला माझा हात पकडून जबरदस्तीने मला ओढत नेऊ लागला .मी त्याच्या हाताला चावून माझा हात सोडवला आणि धावत रस्त्यावर आले तिथून रिक्षा पकडून घरी आले .त्या दिवशी मी फार घाबरले होते त्याने माझा हात इतका घट्ट पकडला होता की त्याच्या नखांचे व्रण माझ्या हातावर उमटले होते . तो किती निर्दयी आहे हे मला त्या दिवशी कळलं होत .आता पुन्हा प्रतापला भेटायची माझी अजिबात इच्छा नव्हती पण नकार कसा द्यावा हे मला सुचत
नव्हतं .प्रताप माझा नवरा आहे अस मानूनच बाबा विचार करत होते आणि नकार द्यायला माझ्याकडे काही कारणही नव्हत कारण उद्या मी दिवसभर घरीच होते तितक्यात आई माझ्या रूममध्ये आली.
" अहो मी काय म्हणते .सोनूच्या लग्नाला अजून दोनवर्ष आहेत .इतक्या लवकर अस कोणाबरोबर बाहेर पाठवणं बर दिसेल का ? लोक काय म्हणतील ?" आई माझी बाजू घेऊन म्हणाली .कदाचित तिला कळल असाव की मला प्रतापबरोबर जायचं नाही .
" आता तु मला अक्कल शिकवणार " बाबा आईवर ओरडले .
" तीला लग्नासाठी तयार नाही करायचय .बिनलग्नाची ठेवायची आहे का ? चांगला पैसेवला पोरगा आहे जितक्या लवकर लग्न होईल तितक बर आहे ." बाबा आता रागात बोलत होते .त्यांचा चढलेला स्वर पाहून आईच्या डोळ्यात पाणी आल .आई आधीपासूनच हळवी होती ती बाबांसमोर काही बोलायची नाही आणि बोलली की अस व्हायच.
" ते कही नाही गुड्डी उद्या तु प्रतापबरोबर फिरायला जायचसच ." बाबांनी सरळ सरळ ऑर्डरच दिली.
" मी मामाकडे जाणार आहे उद्या ." मी घाबरत घाबरतच बोलले .
मी मुद्दामच मामाच नाव घेतल मामा समोर बाबांच काही एक चालणार नव्हत हे मला माहीत होत .
" आता हे कोणी ठरवलं ?" बाबांनी रागातच विचारल.
" मी " आई बोलली .या खोट बोलण्यात तीही माझी साथ देत होती .
" तुम्हाला काय करायचंय ते करा ." बोलून ते रागातच बाहेर निघून गेले .
बाबा बाहेर गेल्यावर मी सुटकेचा निश्वास सोडला .एक गोष्ट मला कळून चुकली होती की आता यातून माझी सुटका नाही . तीन वर्षातल एक वर्ष संपल होत .मी कितीही प्रयत्न केले तरी दोन वर्षानंतर हेच माझ भवितव्य असणार होत .
अभिमान ....
दूसरी सेमिस्टर सुद्धा संपली होती .मी सुट्टीत आता परत घरी म्हणजे नाशिकला आलो होतो .इथे आल्यापासून मम्मी माझे जरा जास्तच लाड करत होती साहजिकच इतक्या दिवसांनी आपला मुलगा घरी येतोय म्हटल्यावर कोणतीही आई खुश होणारच .घरात नेहमी माझ्या आवडीचे पदार्थ बनत होते .पाव भाजी, पालक पनीर ,बटर चिकन , पनीर मखनी , तवा मटण , दम बिर्याणी , सर्वात फेवरेट म्हणजे मिसळ पाव हे सगळ मेसमधे मिळत नव्हत .तसे आम्ही बाहेरच्या हॉटेलमधे अधूनमधून जायचो पण आईच्या हातची चव वेगळीच असते . म्हणून इथे आल्यावर सगळ्यावर मनसोक्त ताव मारायचो .घरात दादा नव्हता म्हणून कधी कधी थोड फार एकट एकट वाटायच पण बाकी मजा येत होती . मी सुट्टी एंजॉय करत होतो .
एके दिवशी मध्यरात्री फोनची रिंग वाजली .फार वेळ रिंग वाजून फोन बंद झाला कोणीही उचलला नाही .दुसऱ्यांदा पुन्हा रिंग वाजू लागली. मी फोन उचलण्यासाठी उठलो असंही झोप मोड झालीच होती .मी फोन उचलण्यासाठी जाणार तितक्यात फोनची रिंग वाजायची बंद झाली कदाचित पप्पांनी त्यांच्या रुममधून फोन उचलला असेल .मी तसाच पडून राहिलो कारण एकदा झोपमोड़ झाल्यावर पुन्हा मला लगेच झोप येत नाही .काही वेळाने मला पप्पांचा मम्मीशी जोरजोरात बोलण्याचा आवाज ऐकू येऊ लागला .मी उठून बसलो आणि नीट ऐकल तर पप्पांचाच आवाज होता . इतक्या रात्री पप्पा मोठ्याने काय बोलत आहेत हे पाहायला मी रूममधून बाहेर येऊन त्यांच्या बेडरूमच्या दरवाजाजवळ येऊन थांबलो .खाली दरवाजा आणि जमिनीच्या फटीतून प्रकाश दिसत होता म्हणजे त्यांच्या बेडरूमची लाईट ऑन होती .इतक्या रात्री मम्मी पप्पा जागे आहेत म्हणजे नक्कीच काहीतरी टेंशन देणारी गोष्ट घडली आहे .पप्पा अजूनही मम्मीशी बोलत होते काय बोलत होते .ते स्पष्ट ऐकू येत नव्हत पण ते रागात होते एवढ नक्की .मघाशी तो फोन येऊन गेला होता त्या नंतरच हे सुरू झाल तो फोन कोणाचा होता हे देखील कळायला मार्ग नव्हता .पंधरावीस मिनिटांनी पप्पांच्या बेडरूमची लाईट बंद झाली .मग मीही तिथे न थांबता झोपायला आलो .
आज सकाळी उठल्यावरही पप्पांचा मूड खराबच होता .मम्मी उदास दिसत होती. मी त्या रात्रीच्या फोनबद्दल विचारणारच होतो पण सकाळी सकाळी पुन्हा तोच विषय काढला तर पप्पा इरिटेड होतील म्हणून मी टाळलं .पप्पा ऑफिसला गेल्यावर मी किचनमध्ये मम्मीच्या बाजूला येऊन उभ राहिलो.
" काय काम आहे ??" मला अस उभ पाहून मम्मीने विचारलं .
" काही नाही .तुला काही मदत हवी का ते पाहायला आलोय ." मी म्हणालो .
" अभी, तुला मी आज नाही ओळखत काय काम आहे सांग ." मम्मी म्हणाली .तिला माझ्या काम असेल तर अशा मस्का मारण्याच्या सगळ्या ट्रिक्ट माहीत होत्या .
" मम्मी रात्री फोन कोणाचा आलेला ग ? सकाळपासून पप्पांचा मूड खराब आहे काही सिरीयस वैगरे " मी विचारलं .
" तुझ्या संदेश दादाने लग्न केलय ."
" कधी ?" मी विचारल .
" काल ....पळून जाऊन ." मम्मी म्हणाली .
मला धक्काच बसला .संदेश दादा म्हणजे माझ्या काकांचा मुलगा तो , मी आणि दादा आम्ही तिघे लहान असताना एकत्रच असायचो .तो आम्हा सर्वात मोठा होता .मी दहावीला असताना त्याच एम.बी.ए. पूर्ण झाल होत त्या नंतर तो मुंबईला गेला आणि आमचा मग जास्त काही संबध नाही आला .तो तसा दादाच्या वयाचा असल्याने त्याच्या संपर्कात असायचा पण माझ्या नाही .
" पण पप्पा का इतके भडकले होते ?" मी विचारल .
" तुझे पप्पा त्याच लग्न त्यांच्या एका मित्राच्या मुलीशी जमवत होते आणि तो कोणत्या तरी दुसऱ्याच मुलीवर प्रेम करत होता .तुझ्या दादाला या सगळ्याबद्दल माहीत होत, तरीही तो पप्पांना काही बोलला नाही म्हणून पप्पा भडकलेत ."
मम्मीने जेव्हा या सर्वात दादाच नाव घेतलं तेव्हा मला अजिबात आश्चर्य वाटल नाही .दादा काहीही करू शकतो या बद्दल मला खात्री होती .संदेशदादाला पळून जायची आयडीयाही माझ्या दादानेच दिली असणार अशीही आता मला शंका येऊ लागली होती .
संध्याकाळी पप्पा जेव्हा घरी आले तेव्हाही त्यांचा मूड ऑफच होता .रात्री जेव्हा मी ,मम्मी आणि पप्पा डायनिंग टेबलसमोर जेवायला बसलो तेव्हा पप्पा बोलू लागले .
" अभी, तुझ्या संदेशदादाने काय केलय तुला कळलच असेल ??
त्याने जे काही केल त्याच मला अजिबात वाईट नाही वाटलं .मला वाईट तेव्हा वाटल जेव्हा मला कळल तुझ्या दादाचीही त्याला साथ होती .तुझ्या दादाने कधीच माझ म्हणणं ऐकलं नाही प्रत्येक वेळी त्याच्या जे मनात यायच तेच तो करायचा आणि आताही तेच करतोय ." थोडा वेळ थांबून ते पुन्हा बोलू लागले .
" मला तुझ्या दादाकडून आता कोणतीही अपेक्षा राहिली नाही .तूच माझा लाडका मुलगा आहेस .आजपर्यंत माझी प्रत्येक गोष्ट डोळे बंद करून ऐकलीस .आता एक सांगतोय ऐकशील ??" त्यांनी माझ्या डोळ्यांत पाहत प्रश्न केला.
" हो " मी ही नेहमी प्रमाणे उत्तर दिल कारण त्याना नकार द्यायची मी कधी हिम्मतच केली नव्हती आणि आताही माझ्यात हिम्मत नव्हती किमान आज सकाळपासून घरात जी परिस्थिती होती त्यात तरी .
" हे बघ अभी, मी बाप आहे तुझा .मी नेहमी तुझ्या भल्याचाच विचार करणार .अभी तू
Reading books romantic stories you will plunge into the world of feelings and love. Most of the time the story ends happily. Very interesting and informative to read books historical romance novels to feel the atmosphere of that time.
Comments (0)